मराठी बिझनेस आयडिया-अमृततुल्य चहा व्यवसाय करावा की नाही | Marathi business Idea-wether do or not Amruttulya Tea Business
अमृततुल्य चहा Franchise | Amruttulya Tea Franchise
स्वच्छ टकाटक दिसणारे चहाचे पॉश आऊटलेट,
त्या बाहेर किटली आणि कप घेऊन सफेद लेंगा किंवा धोतर घातलेला, डोक्यावर मराठीपणाची ओळख म्हणून गांधी टोपी घातलेला एका रांगड्या मध्यमवयीन मिशिवाल्या काकांचा पुतळा, दुकानावर कॅलिग्राफी केलेला छान 'अमृततुल्य' चा ठळक आकर्षक साईन बोर्ड. दुकानात स्टील च्या ट्रे मध्ये ठेवलेले विशिष्ठ आकाराचे असंख्य चहा कप, आत मध्ये स्वच्छ पेहरावात असणारा कामगार वर्ग, आणि चहा च्या चवीची आणि वासाची एक विशिष्ट अशी धाटणी, ही झाली'अमृततुल्य चहा' ची ओळख.
येवले यांनी सुरुवात केली.
बघता बघता शेकडो फ्रांचायजी झाल्या. येवले अमृततुल्य च्या आगळ्या वेगळ्या चवीची भुरळ लोकांना पडली. 'येवले चहा-एकदा पिऊन तर पहा'असे आवाहन, येवलेंच्या प्रत्येक आऊटलेट मध्ये प्रत्येक दिवशी चहाची सारखीच चव आणि गुणवत्ता, यामुळे येवले अमृततुल्य चहा बघता बघता सर्वांची फेवरीट झाली
आता चौका चौकात वेगवेगळ्या अमृततुल्य चहाची वेगवेगळी दुकाने दिसू लागली.पूर्वी एका चौकात झोकात चालणारे अमृततुल्य चे दुकान आता आजू बाजूला झालेल्या स्पर्धे मुळे स्ट्रगल करू लागले, ग्राहक विभागले, अमृततुल्य चहाची लोकप्रियता घसरू लागली, चौकात सर्वात आधी सुरू झालेले अमृततुल्य चे पहिले दुकान फ्रांचायझी होल्डर ला बंद करावे लागले. दुसरे बंद पडायच्या मार्गावर आहे अशी परिस्थिती आहे.
तर प्रश्न असा पडतो की ह्या व्यवसायात उतरावे की नाही. तुम्ही फ्रांचायझी घेऊ पाहताय किंवा स्वतःच्या ब्रँड चे मॉड्युल राबवू पाहताय तर खालील गोष्टी लक्षात घेऊन तुम्हाला कदाचित याचा निर्णय घेणे सोपे होईल.
सर्वेक्षण कसे कराल.
आपण घेणार असलेल्या जागेचे भाडे किती आहे, आणि तिथली वर्दळ आणि स्पर्धा लक्षात घेता 10 रुपये किमतीचे रोज किती कप चहा अंदाजे विकू शकू त्या नुसारे तुम्ही अंदाज घेऊ शकता की महिन्याच्या उलाढाली मध्ये आपले भाडे,व्यवसायासाठी घेतलेले लोन,raw material,वीजबिल आणि कामगारांचे पगार हे वजावट होऊन किती प्रॉफिट राहणार आहे ह्याचा अंदाज येईल. यात तुम्हाला खेळत्या भांडवलासाठी ही काही रक्कम शिल्लक ठेवायची आहे हे ही लक्षात असू द्या.तुम्ही घेणाऱ्या फ्रांचायजी च्या चहाची गुणवत्ता आणि नावलौकिक यांचा ही विचार करणे गरजेचे आहे.नाहीतर ग्राहक जाणीवपूर्वक तुमच्या दुकाना कडे पाठ फिरवेल.
गुंतवणूकीच्या टिप्स
गुंतवणूकित तुम्ही स्वतः काटकसर करू शकता.
गुंतवणुकी मध्ये अंतर्भूत असलेल्या गोष्टी म्हणजे दुकानाच्या भाड्याचे डिपॉझिट. दुकान स्वतःचे असेल तर एक चांगली रक्कम तुमची वाचणार आहे. गुंतवणुकीचा दुसरा मुद्दा म्हणजे इंटेरिअर आणि किचन इक्विपमेंट इत्यादी,जर फ्रांचायजी फी म्हणून तुम्ही जी रक्कम देणार आहात त्यात च फ्रांचायझर तुम्हाला ह्या सर्व गोष्टी पुरवणार असेल तर लक्षात ठेवा फ्रांचायझर वरील गोष्टींमध्ये स्वतःचा फायदा ठेऊन तुम्हाला बिल करणार आहे. उदाहरणार्थ किचन इक्विपमेंट मध्ये लागणारी भांडी,ट्रॉली,कप,स्टेनलेस स्टील चे वर्क टेबल,शेगडी,फ्रीझर,बॉयलर,चहा ची डिस्पेन्सर किटली इत्यादींच्या किमतींमध्ये स्वतःचा ठराविक फायदा जोडून तुम्हाला त्या किमती दाखवतो, फ्रांचायझर ला तुम्ही ह्या किचन इक्विपमेंट च्या खर्चात घासाघीस करून ते बिल कमी करू शकता. काही अमृततुल्य चे ब्रँड फ्रांचायजी घेताना फक्त ब्रँड चे नावलौकिक आणि रेसिपी चे चार्जेस घेऊन तुम्हाला फ्रांचायजी ऑफर करतात. बाकी इंटेरियर खर्च आणि किचन मध्ये लागणारे सामान, युनिफॉर्म इत्यादिंचा खर्च तुम्हाला करायला सांगतात. अर्थात नवोदित ब्रँड च ही सवलत तुम्हाला देतात, त्यांना फक्त लवकरात लवकर त्यांच्या ब्रँड चे अस्तित्व मार्केट मध्ये आणायचे असते.
गुंतवणुक साधारण किती असेल?
वरील दोन्ही पैकी केस मध्ये तुमची गुंतवणूक ही 1 लाखापासून 20 लाखांपर्यंत होऊ शकते.
किती फायदा-नुकसान होईल?
जर दिवसाला 500 चहा विकून 5000 मिळणार असतील तर त्या मध्ये तुमचे दैनंदिन खर्च,लाईट बिल,कच्चा माल,भाडे,कामगारांचे पगार जाऊन तुम्हाला किती रुपये वाचतात आणि ते तुमच्यासाठी समाधानकारक आहेत का ह्या वर तुम्हाला होणारा फायदा किंवा नुकसान अवलंबून आहे, कुठल्या ही परिस्थितीत 'ना नफा ना तोटा बिंदू' (break even point) ओलांडून तुम्ही फायदा कमावणार आहात इतकं लक्षात ठेवा.
एकंदरीत तुमच्या अमृततुल्य व्यवसायाचे यशापयश हे मार्केट मधली स्पर्धा,डिमांड आणि तुमच्या होल्डिंग क्षमतेवर अवलंबून असणार आहे.फ्रांचायझर तुम्हाला त्यांच्या काही आधीच्या ग्राहकांच्या सक्सेस स्टोरी दाखवून तुम्हाला आमचा ब्रँड तुम्हाला कसा जास्तीत जास्त पैसे मिळवून देईल, किती लवकर तुमच्या गुंतवणुकी चा परतावा (Roi) देईल अशी आश्वासने दाखवून त्या प्रलोभनाला बळी पडून तुम्ही आर्थिक अडचणीत जाऊ शकता. चहा चा व्यवसायाची इंडस्ट्री ही वर्षानुवर्षे वाढत जाणारी अर्थात च आहे. येवले अमृततुल्य चहा' ने मिळवले ले यश अपेक्षित असेल तर प्रचंड मेहनत आणि टिकून राहण्याची क्षमता हेच महत्वाचं असेल.

Comments
Post a Comment