राकेश झुनझुनवाला यांच्या शेअर मार्केट गुंतवणूक करण्यासाठी टिप्स
शेअर मार्केट चे भारतीय बिग बुल राकेश झुनझुनवाला यांचे नुकतेच निधन झाले. एक महत्वाकांक्षी शेअर मार्केट गुंतवणूकदार, भारताचे Warren Buffet वॉरेन बफेट ,जगातील 438 वे श्रीमंत,आणि भारतीय शेअर बाजारातील एक मोठे Trader अशी त्यांची ओळख अख्या जगाला आहे. बऱ्याच शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी ते आदर्श होत.मृत्यू समयी त्यांची संपत्ती 5.8 Million (अंदाजे चाळीस हजार करोड) डॉलर इतकी होती. शेअर मार्केट करिअर मधील सुरुवात त्यांनी 5000 रुपयांच्या गुंतवणुकी वर केली होती, ते चार्टर्ड अकाउंटंट होते. Inside Trading (शेअर मार्केट मध्ये अंतर्गत खरेदी विक्री बाजार वाढवणे किंवा घसरवणे) च्या आरोपा खाली SEBI च्या चौकशी ला सामोरे जावे लागले होते. एखाद्या कंपनीच्या शेअर्स मध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर त्या कंपनीच्या शेअर्स चा भाव चांगलाच वधारायचा, आणि ही इन्व्हेस्टमेंट म्हणजे काही हजार करोडोंच्या संख्येत होती. जसे की त्यांची सर्वात मौल्यवान होल्डिंग घड्याळ आणि दागिने बनवणारी टायटन कंपनी ची गुंतवणूक,टायटन कंपनीमध्ये त्यांची होल्डिंग व्हॅल्यू रु 8,8...