हनुमंत गायकवाडांची BVG देतेय ONLINE पैसे कमावण्याची संधी,Cash My Lead Application वरून लीड्स जनरेट करा आणि BVG तुम्हाला पैसे देईल.|Hanumant Gaikwad'S BVG giving you the opportunity to earn money ONLINE, generate leads from Cash My Lead Application and BVG will pay you.
महाराष्ट्रात अनेक तरुण आहेत ज्यांना स्वतःचा उद्योग सुरू करायचा आहे,स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे पण भांडवला अभावी सर्व अडतंय. मशिनरी मध्ये गुंतवणूक करावी लागते,फॅक्टरी बांधावी लागते,त्यासाठी जागा मिळवावी लागते,कुशल कामगारांची अडचण आहे,प्रोसेसिंग कशी करावी हे माहीत नसतं, या सर्व गोष्टींचा विचार करता Bvg India गृप च्या संचालक श्री हनुमंत गायकवाड यांनी सातारा मेगा फूड पार्क इथे भव्य दिव्य असे इन्फ्रास्ट्रक्चर उभारले आहे ज्यात नवउद्योजकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी त्यांना उत्पादन करण्यासाठी लागणाऱ्या फॅक्टरी चा सेटअप आधीच तयार आहे, तुम्हाला फक्त प्रोसेसिंग ची फी आणि किरकोळ गुंतवणूक करून तुमचे स्वप्न साकार करता येणार आहे. या लेखात या विषयी संक्षिप्त स्वरूपात माहिती दिली आहे. अधिक माहिती साठी तुमचा मोबाईल नंबर कमेंट बॉक्स मध्ये द्या.
Big Bull वॉरेन बफेट म्हणतात की एका ठिकाणावरून 100 रुपये कमावण्या पेक्षा 100 ठिकाणावरून 1-1 रुपया कमवा, जर एखादा मार्ग जरी बंद पडला तरी उरलेल्या 99 मार्गांवरून तुम्हाला 99 रुपये मिळत च राहतील.गुजराथी-मारवाडी समाजाचं हेच तत्व आहे जे त्यांच्या श्रीमंतीचं गमक आहे.
सांगण्याचे तात्पर्य एवढेच की नोकरी किंवा व्यवसाय करताना अशा अनेक संधी आपण काना डोळा करत असतो. बऱ्याच संधी आपल्याला माहीत नसतात. BVG म्हणजे भारत विकास ग्रुप ही भारतातील एक अग्रगण्य कंपनी आहे जी भारतात विभिन्न सेवा निर्माण करते.हाऊस किपिंग,अक्षय ऊर्जा निर्माण,कचरा व्यवस्थापन इत्यादी सेवा BVG देते. BVG चे संस्थापक श्री हनुमंत गायकवाड (Hanumant Gaikwad)हे अनेकांचे आदर्श आहेत. एका सर्वसामान्य घरातून कष्ट करत करत इंजिनिअरिंग,टाटा मोटर्स मधली नोकरी ते एक यशस्वी मराठी उद्योजक इथपर्यंत ची मजल दरमजल हनुमंत गायकवाड यांच्या साठी सोपी नव्हती. मंत्रालय,राष्ट्रपती भवन,रेल्वे ते इतर अनेक मोठ्या सरकारी-निम सरकारी आणि खाजगी संस्थांना फॅसिलिटी मॅनेजमेंट च्या सुविधा पुरवण्याचे काम BVG करते.
 |
| BVG सेवा देत असलेल्या कंपन्या |
 |
BVG चे संचालक श्री.हनुमंत गायकवाड
|
BVG ने पब्लिश केलेल्या कॅश माय लीड (Cash My Lead) ह्या एप्लिकेशन मध्ये तुम्हाला पैसे कमावण्याची संधी मिळते आहे, तुम्हाला हे एप्लिकेशन डाउनलोड करायचे आहे.Sign Up लॉगिन झाल्या नंतर तुमच्या अवती भवती नोकरी किंवा उद्योग व्यवसाय करू पाहत असणाऱ्या लोकांच्या रेफरन्स लीड्स BVG च्या Cash My Leads अँप्लिकेशन मध्ये द्यायच्या आहेत. ह्या लीड्स BVG कडे गेल्यावर 24 तासात रेफर केलेल्या व्यक्तींना BVG ची टीम संपर्क करते आणि ह्या लीड्स फुलफिल झाल्याच तर तुम्हाला ह्या कामाचे पैसे मिळणार आहेत ते ही थोडे थोडके नसून ₹5000 पर्यंत तुमची कमाई फक्त एका रेफरन्स च्या माध्यमातून मधून होणार आहे.
अँप्लिकेशन डाउनलोड केल्या नंतर तुम्हाला त्यात लॉगिन करावं लागेल, त्यासाठी तुम्हाला मोबाईल नंबर आणि इमेल आय डी देऊन रजिस्टर करावं लागेल. त्या नंतर तुम्हाला त्यात आपला जिल्हा,तालुका आणि गाव यांची माहिती द्यावी लागेल.
रजिस्ट्रेशन झाल्या नंतर अप्लिकेशन मध्ये अनेक ऑप्शन दिसतील. यात पहिला ऑप्शन Waste असा आहे.
- बायोगॅस संयंत्र -लीड रेफरन्स कमिशन-500 रुपये
 |
बायोगॅस संयंत्राची माहिती.
|
या ठिकाणी बायोगॅस एनर्जी आणि लहान बायोगॅस संयंत्र असे दोन प्रोडक्टस आहेत. यातील घरगुती लहान संयंत्र बसवण्या साठी येणारा खर्च हा 15 हजार ते 2 लाख इतका आहे, ज्यात रोज 10 ते 40 किलो टाकाऊ अन्न धान्य शेण टाकून इंधन बनवू शकता, आणि बायोगॅस एनर्जी हे मोठे संयंत्र असून यातील गुंतवणूक 3 लाखांपर्यंत जाते. जर तुम्ही तुमच्या ओळखीच्या व्यक्तीचा नंबर या साठी Cash My Leads Application वर दिला आणि जर लीड फुलफिल झाली तर तुम्हाला याचे रेफरन्स कमिशन म्हणून 100 ते 500 रुपये मिळू शकतात.
2.NAPS Business Associate-लीड रेफरन्स कमिशन-5000 रुपये
Waste या ऑप्शन नंतर तुम्हाला या ठिकाणी skills असा एक ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक केल्या नंतर तुम्ही पहा
तुमच्या पाहण्यात जर कुणी मनुष्यबळ पुरवण्याचे काम करत असेल आणि त्यांची तुम्ही लीड जनरेट केली तर तुम्हाला ती लीड फुलफिल झाल्यावर 5000 रुपये कमिशन मिळेल.
3. FOOD-लीड रेफरन्स कमिशन-3000 ते 25000 रुपये
यानंतर चा जो ऑप्शन आहे food या मध्ये फूड प्रोसेसिंग मध्ये जे व्यवसाय करत आहेत किंवा जे व्यवसाय करू इच्छित आहेत त्यांच्या साठी BVG ने काही इन्फ्रास्ट्रक्चर उभे केले आहे याची माहिती दिली आहे आणि त्या पुढे असे लीड्स जनरेट केल्यास तुम्हाला किती कमिशन मिळेल याची ही माहिती दिली आहे.
यातील ऑप्शन आपण पाहू.
- SALES Agent/Dealer/Distributor-लीड रेफरन्स कमिशन-5000 रुपये
BVG India या ग्रुप ची BVG Health Foods ही कंपनी 30 प्रकारचे मसाले,डाळी,हळद,पीठे,जॅम,बाटलीबंद पाणी,सिरप,पल्प,ज्यूस इत्यादी उत्पादने बनवते. ही उत्पादने महाराष्ट्रात प्रत्येक गावी घरोघरी पोहोचवण्यासाठी डिस्ट्रिब्युटर नेटवर्क बनवण्यासाठी वितरक नेमणे आहे, तुमच्या ओळखीत असलेल्या व्यक्तीची वितरक म्हणून लीड जनरेट करून दिली आणि ती व्यक्ती वितरक झाल्यास तुम्हाला याचे रेफरन्स कमिशन 5000 रुपये इतके मिळेल.
- BVG India Group च्या सातारा मेगा फूड पार्क मध्ये प्लॉट सेल/रेंट.-लीड रेफरन्स कमिशन-25000 रुपये
 |
| Bvg चे सातारा मेगा फूड पार्क येथे व्यवसायाची संधी |
Bvg India Group मध्ये सर्व कृषी पूरक,कृषी आधारित आणि अन्न प्रक्रिया उद्योगास चालना मिळावी म्हणून सातारा इथे 65 एकर परिसरात भव्य दिव्य असे इन्फ्रास्ट्रक्चर चे 'सातारा मेगा फूड पार्क' उभारले आहे.
यात अन्न प्रक्रिया आणि उत्पादनात लागणारी सर्व अद्ययावत उपकरणे प्रोसेसिंग लाईन,स्टोरेज,वीज,पाणी ,कोल्ड स्टोरेज च्या मोबाईल van ,इत्यादी सोयी उपलब्ध आहेत. तसेच अद्ययावत प्रयोगशाळा उपलब्ध असल्याने लॅब टेस्टिंग ची सुविधा ही उपलब्ध आहे.ज्यांना आपले उत्पादन सुरू करायचे असल्यास अतिरिक्त प्लांट उभारून भांडवल गुंतवण्या पेक्षा 'सातारा मेगा फूड पार्क' मधल्या या सेवांचा लाभ घेण्यासाठी या ठिकाणी प्लॉट रेंट किंवा खरेदी करू शकता. असे उद्योग करण्यास इच्छुक असणाऱ्यांचे लीड जनरेट करून भाडे करार किंवा खरेदी खत झाल्यानंतर Bvg Group तुम्हाला रुपये 25000/- रेफरन्स कमिशन म्हणून देईल. आस पास असणाऱ्या धडपड्या उद्योजकांचे संपर्क क्रमांक Bvg च्या Cash my Lead या application मध्ये सबमिट करा. या उद्योजकांचे ही कल्याण होईल आणि त्याच बरोबर तुम्हाला ही छान कमिशन मिळेल. या पार्क मध्ये सुरू होणाऱ्या उद्योगास केंद्र सरकार कडून 35% अनुदान किंवा 5 कोटी या पैकी जे जास्त असेल ते उपलब्ध होते,याच बरोबर राज्य सरकार कडून 50 लाख अनुदान तसेच वीज-पाणी आणि Gst यात विशेष सवलत मिळते.
- कोल्ड स्टोरेज/शीतगृह-लीड रेफरन्स कमिशन-3000 रुपये
 |
| SATARA MEGA FOOD PARK COLD STORAGE FACILITY |
सातारा मेगा फूड पार्क येथे कोल्ड स्टोरेज मध्ये शेतीमालाची साठवणूक करणाऱ्या व्यक्तीचा रेफरन्स दिल्यास तुम्हाला 3000 रुपये कमिशन मिळेल. अंदाजे कमीत कमी 1 टन मालाची साठवणूक करता येईल.
- Fruits & Vegetable Processing Unit-लीड रेफरन्स कमिशन-5000 रुपये.
 |
| FRUIT & VEGITABLE Processing Unit |
सातारा मेगा फूड पार्क इथे सुमारे 150 एकर परिसरात फळे आणि भाज्या प्रक्रिया उद्योग करणाऱ्यांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कुशल कामगारांच्या मदतीने आपल्या शेती मालावर प्रक्रिया करून फळांचे पल्प,ज्यूस,जॅम,स्क्वाश इत्यादी बनवून फिनिशेड फाईन फूड बनवून दिले जाईल.
जर तुम्ही लीड दिलेल्या व्यक्तीने सातारा मेगा फूड पार्क मध्ये त्याच्या शेतीमलावर प्रक्रिया उद्योग सुरू केला तर त्याचे लीड कमिशन म्हणून तुम्हाला 5000 रुपये मिळतील. या साठी अंदाजे 50000 ते 5 लाख गुंतवणूक होऊ शकते.
- मसाला रिपॅकिंग आणि ब्रँडिंग-लीड रेफरन्स कमिशन-5000 रुपये
 |
| मसाले रिपॅकिंग आणि ब्रँडिंग |
आपल्या परिचयातील जी व्यक्ती मसाला व्यवसाय करू इच्छिते त्या व्यक्तीला 30 प्रकार चे मसाले मशिनरी,कच्चा माल इत्यादी गुंतवणूक केल्याशिवाय ब्रँड आणि पॅकेजिंग करून देण्याची सुविधा Bvg सातारा मेगा फूड पार्क इथे उपलब्ध आहे. या साठी गुंतवणूक अंदाजे 1 लाख ते 5 लाख होईल. अशा व्यक्तीचा रेफरन्स दिल्यानंतर सादर व्यक्तीने ह्या सेवांचा लाभ घेतला तर तुम्हाला या लीड चे कमिशन 5000 रुपये मिळतील.
- बाटली बंद पाणी पॅकेजिंग आणि रिफिलिंग उद्योग-लीड रेफरन्स कमिशन-5000 रुपये
 |
| PACKAGED WATER REFILING & BRANDING |
जर तुमच्या परिचयातील व्यक्ती बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय करू इच्छित असेल तर कुठल्याही रिस्क शिवाय प्लांट न उभारता कमीत कमी गुंतवणुकी मध्ये सातारा मेगा फूड पार्क इथे मिळत असलेल्या सुविधेचा लाभ घेण्यासाठी त्या व्यक्तीचे लीड दिल्यास लीड फुलफिल झाल्यानंतर तुम्हाला याचे कमिशन 5000 रुपये मिळतील आणि यासाठी त्या व्यक्तीला गुंतवणूक 50000 पासून पुढे करावी लागेल.स्वतःचा पाण्याचा ब्रँड बनवू इच्छिणाऱ्या व्यावसायिकांना मदत करा.
तसेच Bvg India ची इतर उत्पादने जसे की आरोग्यविषयक सप्लिमेंट,कृषी उपकरणे, कृषी शॉपी इत्यादी साठी सुद्धा तुम्ही लीड जनरेट करून पैसे कमवू शकता. या साठी हे ऍप्लिकेशन डाउनलोड करून अधिक माहिती घ्यावी.तुम्ही म्हणाल की हे शे पाचशे आणि काही हजार रुपये कमिशन मिळवून काय होणार आहे पण गाव पातळी वर काही लीड्स जनरेट करून त्यांच्या द्वारे मिळणाऱ्या काही हजार रुपयांमार्फत आपले दैनंदिन खर्च भागवले जाऊ शकतात इतके लक्षात ठेवा, मारवाडी-गुजराथी लोकांची ही टेंडेन्सी च असते की कुठल्याही मार्गे पैसे आले पाहिजेत जेणेकरून किरकोळ खर्च भागवले जाऊन चांगली सेव्हिंग होत राहील.
Please send me details.
ReplyDelete9637019685