आर्यन सुरेश कुटे-भारतातील सर्वात लहान उद्योजक 10 वर्षाचा 'मराठी' मुलगा आहे .

 आर्यन सुरेश कुटे-भारतातील सर्वात लहान उद्योजक 10 वर्षाचा 'मराठी' मुलगा आहे | aryen Suresh Kute-The youngest entrepreneur in India is a 10 year old 'Marathi' boy.

Image source-OAO india Website


उद्योग धंदा म्हंटला की 'मराठी माणूस के बस की बात नही' असं आपण च म्हणतो. आणि खरोखर च 'मराठी माणूस' हा उद्योग धंद्यात पाहिल्यापासून मागेच आहे.8 तास नोकरी, सरकारी नोकरी या पलीकडे त्याचे सुरक्षित आयुष्य आणि सुखी समाधानी जीवनाची व्याख्या नाही.मराठी माणूस उद्योग धंद्यात नाहीच असं बोलणं साफ चुकीचं ठरेल असे बरेच अपवाद आज वेगवेगळ्या क्षेत्रात आहेत. पण हे प्रमाण खूप च कमी आहे, याला कारणीभूत म्हणजे आपल्या समाजव्यवस्थेत व्यवसायाचे बाळकडू च पाजले जात नाहीत, पिढ्यां पिढ्या धंद्या विषयी नकारात्मक दृष्टिकोन ठेवला जात आहे. आता परिस्थिती बदलते आहे.मराठी माणूस आणि उद्योग धंद्यावर चे वर्चस्व यामधील पूल बांधायला अनेक खारोट्यानी सुरुवात केली आहे.आर्यन सुरेश कुटे (Aryan Suresh Kute) हा या सर्व खारोट्यांमधील लहान उद्योजक आहे. 'फोर्ब्स इंडिया' (Forbes India) मध्ये झळकलेल्या आर्यन ला (इंटरप्रेन्युअर एक्सलेन्स 2019 मध्ये सर्वांत तरुण उद्योजक)
(Youngest Entrepreneur Award” in “Entrepreneur Excellence Awards-2019) हा अवार्ड मिळाला,

कोण आहे 'आर्यन सुरेश कुटे'? | Who is Aryan Suresh Kute? 

आर्यन महाराष्ट्रातील प्रसिद्ध 'कुटे ग्रुप'(Kute Group) चे संचालक श्री सुरेश कुटे (Suresh Kute) यांचा मुलगा आहे. आर्यन च्या आईचे नाव अर्चना कुटे आहे आणि त्या ही कुटे ग्रुप च्या संचालक ग्रुप मधील सदस्य आहेत .

1950 ला स्थापन झालेल्या 'कुटे ग्रुप' चे खालील प्रमाणे कंपन्यांचे साम्राज्य आहे.

  • Tirumalla Oil Refinery Pvt. Ltd.
  • Tirumalla Edible Oil & Food India Pvt. Ltd.
  • Tirumalla Edible Oils Trading India Pvt. Ltd.
  • Tirupati Oil Cake Industries Pvt. Ltd.
  • Tirumalla Groundnuts Industries India Pvt. Ltd.
  • Tirumalla Safflower Oil India Pvt. Ltd.
  • Tirumalla India Storehouse Pvt. Ltd.
  • Shree Tirumalla Cotton Cake Trading LLP
  • Shree Tirumalla Pressing Factory LLP
  • Tirumalla Fuels India Pvt. Ltd.
  • DNY Remedies India Pvt. Ltd.
  • DNY Supply Chain Solutions Pvt. Ltd.
  • Kute Sons Dairys Limited
  • Kute Sons Fresh Dairy Pvt. Ltd

आर्यन ला इतर मुलांप्रमाणे च लहान पणी व्हिडीओ गेम खेळायला आवडायचे.पण आर्यन च्या मनात हे गेम कसे बनवतात या बद्दल कुतूहल निर्माण झालं आणि एका कल्पनेचा जन्म झाला आणि तिचा विस्तार OAO India या कंपनी मधून झाला. आज OAO India कंपनी चा CMD आणि Founder आहे आर्यन. 

गेमिंग इंडस्ट्री (Gaming Industry) मधील भविष्यातील हालचालींविषयी आर्यन ला या वयात च जाणीव झाल्याने गेमिंग सोल्युशन्स साठी त्याच्या बालमनाच्या चष्म्यातून एक vision पाहिलं गेलं,ते साकारलं गेलं. 

आज कुटे ग्रुप च्या कंपन्यांच्या ताफ्यात OAO India दिमाखाने उभी राहू पाहतेय. Web Development,Digital Marketing, Mobile App, Web Solutions अशा सर्व्हीस चा पोर्टफोलिओ OAO India कंपनीच्या यादीत आहे. 

OAO India कंपनीचे लोकांच्या पसंतीस उरलेले गेम 

'कृष्णा माखन मस्ती' (Krishna Makhan Masti)  

Image Source OAO India 

बबल शूटर गेम च्या धाटणी चा हा गेम मुलांचा मनपसंत गेम आहे, यात Bal krishna हा त्याच्या सवंगड्यांसोबत एक मजेदार कामगिरी करताना दिसतो, विविध रंगी मटकी फोडून त्यातलं माखन तो आणि त्याचे सवंगडी खातात,यात विविध टप्प्यातील challenges ह्या खेळाला अजून मनोरंजक बनवतात. 

इंडियन फूड बॅश (Indian Food Baash

Image Source-The kute Group website


हा गेम सुद्धा प्रसिद्ध गेम Candycrush या गेम कडून प्रेरणा घेऊन बनवला असला तरी ह्या खेळात Challenges अशा प्रकारे आहेत की candycrush पेक्षा नक्कीच वेगळा अनुभव आणि आनंद यात मिळतो. 

आर्यन ने एका मुलाखतीत सांगितल्या प्रमाणे त्याचे गेम्स असे असावेत जे कोणत्याही वयोगटातील (Age Group) व्यक्तींना खेळायला Excitement वाटली पाहिजे. 

वाढदिवसाच्या दिवशी WWE चा सुपर स्टार जॉन सीना (John Cena) प्रमाणे हटके एन्ट्री मारणारा आर्यन बोर्ड मिटिंग मध्ये हिरीरीने सहभागी होतो.कुटुंबाची व्यावसायिक पार्श्वभूमी जरी असली तरी वयाच्या 9 व्या 10 व्या वर्षी आपल्या कल्पनेला यशस्वी पणे वास्तवात उतरवणे हे थोरा मोठ्याना ही जमत नाही. 







Comments

Popular posts from this blog

मराठी बिझनेस आयडिया-अमृततुल्य चहा व्यवसाय करावा की नाही | Marathi business Idea-wether do or not Amruttulya Tea Business

शेरशाह विक्रम बात्रा कोण आहेत? | Who is Shershah Vikram Batra