शेरशाह विक्रम बात्रा कोण आहेत? | Who is Shershah Vikram Batra

 शेरशाह विक्रम बात्रा कोण आहेत? | Who is Sher shah Vikram Batra

15 ऑगस्ट जवळ आला आहे, सणासुदिंच्या भारत देशात सणांआधी पासून 'माहोल' असतो. 15 ऑगस्ट,26 जानेवारी दिवशी जिलेबी आणि देशभक्तीपर पिक्चर हे समिकरण प्रत्येक भारतीयांच्या मनात असते, आज 12 ऑगस्ट रोजी एक हिंदी बहुचर्चित चित्रपट 'शेरशाह' (Shershah) प्रदर्शित झाला असून या पिक्चर नंतर एक नाव Google Trending ला टॉप वर आहे ते म्हणजे 'विक्रम बात्रा' 

Image Source Wikipedia

कोण आहेत हे विक्रम बात्रा? त्यांच्या विषयी काही माहिती जाणून घेऊया. 

विक्रम बात्रा हे कारगिल युद्धात सहभागी असणारे  सेना अधिकारी होते. कारगिल युद्धात त्यांना अभूतपूर्व पराक्रम करून वीरमरण आले. मृत्यूनंतर त्यांना शौर्याचा सन्मान म्हणून परमवीर चक्र देऊन सन्मानित करण्यात आले. 

Image Source -Forbes.

सैन्यात त्यांना शेरशाह म्हणजे सिंहाचा राजा अशी उपमा होती.जुळे असल्यामुळे त्यांना 'लव' आणि त्यांच्या जुळ्या भावंडाला 'कुश' अशा नावांनी संबोधित केलं जायचं.

शाळेत असल्यापासून NCC मध्ये 'विक्रम बात्रा' यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता त्यामुळे सैन्यात जाण्याच्या त्यांच्या इच्छेला बळकटी मिळाली. कॉलेज जीवनात विक्रम हे उत्कृष्ट टेनिस पटू होते. तेव्हाच त्यांनी CDS (Combined Defense Service Exam) परीक्षेची तयारी सुरू केली होती. याच दरम्यान त्यांनी हॉंगकॉंग मध्ये मिळणाऱ्या मोठ्या पगाराची मर्चंट नेव्ही मधली नोकरी ही नाकारली. 


1996 मध्ये NDA डेहराडून इथे प्रवेश मिळवल्यानंतर 1997 मध्ये 13 जम्मू काश्मीर रायफल तुकडीत लेफ्टनंट या पदावर नियुक्त झाले. कमांडो ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर 1999 मध्ये कारगिल युद्धात सहभागी होऊन हम्प आणि राकी नाब या ठिकाणांवर विजय मिळवून विक्रम यांची कॅप्टन या पदावर पदोन्नती झाली. 

यानंतर 1 जून 1999 रोजी 5140 या अतिदुर्गम तळावर रणधुमाळी करून सकाळी 3.30 विजय प्राप्त करून त्या टेकडी वर तिरंगा फडकवला आणि रेडियो वरून या विजयाची खबर 'यह दिल मांगे मोर' असे म्हणून भारताला दिली. दुसऱ्या दिवशी विक्रम आणि त्यांच्या पराक्रमी साथीदारांचे 5140 या टेकडीवर तिरंगा हातात घेऊन असलेले फोटो जगभरात झळकले.

पुढे 'गड आला पण सिंह गेला' या उक्ती प्रमाणे 4875 टेकडी वर विजय मिळवताना विक्रम यांना वीरमरण प्राप्त झाले.

एकतर बर्फाच्छादित टेकडीवर तिरंगा फडकवून येईन अथवा त्याच तिरंग्यात गुंडाळून येईन' हे त्यांचे वाक्य आज ही सैन्यात अभिमानाने पुन्हा पुन्हा म्हंटले जाते. 

सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिषेक बच्चन 'विक्रम बात्रा' यांच्या भूमिके मध्ये| Siddharth and Abhishek in role of 'Vikram Batra' 


2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या LOC कारगिल या चित्रपटात 'अभिषेक बच्चन' यांनी आणि आज 12 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या शेरशाह या चित्रपटात 'सिद्धार्थ मल्होत्रा' यांनी 'विक्रम बात्रा' यांचे चरित्र अभिनित केले आहे. 

विक्रम बात्रा यांचे लग्न झालेले नाही.

भारत देशातील जनता ही सिनेमॅटिक आहे,सिनेमा हे इथल्या संस्कृती मध्ये प्रभाव टाकणारे मुख्य साधन आहे, जरी शाळा कॉलेज मध्ये कारगिल युद्धविषयी शिकवले जात नसले तरी या चित्रपटा मुळे विक्रम बात्रा यांच्या शौर्याचे कायम स्मरण राहील.



Comments

Popular posts from this blog

मराठी बिझनेस आयडिया-अमृततुल्य चहा व्यवसाय करावा की नाही | Marathi business Idea-wether do or not Amruttulya Tea Business

आर्यन सुरेश कुटे-भारतातील सर्वात लहान उद्योजक 10 वर्षाचा 'मराठी' मुलगा आहे .