499 रुपयात बुक करा OLA ची सर्वात स्वस्त इ-स्कुटर
499 रुपयात बुक करा OLA ची सर्वात स्वस्त इ-स्कुटर S1-24 तासात झाल्या विक्रमी लाख गाड्या बुक| Book OLA eScooter S1 For 499/-
Many Color-All Green हे ब्रीद वाक्य आहे OLA च्या इ-स्कुटर चे. 10 रंगात येणारी ही स्कुटर पर्यावरणासाठी ग्रीन आहे असे OLA ला सुचवायचे आहे.
![]() |
| PHOTO Credit-Livemint.com |
इ स्कुटर म्हणजे इलेक्ट्रिकल चार्जिंग वर चालणारी स्कुटर.इलेक्ट्रिकल वेहीकल या पेट्रोल सारख्या पारंपरिक इंधना पेक्षा स्वस्त मेंटेनन्स देतात,तसेच धूर सोडत नसल्याने इलेक्ट्रिकल वेहिकल च्या वापराने वायू प्रदूषण निश्चित च मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे.सध्या भारतात 15 करोड दुचाक्या आहेत ज्या पेट्रोल वर चालतात.एकेकाळी गावात क्वचित सधन श्रीमंतांकडे दिसणाऱ्या दुचाक्या आता प्रत्येक दारात दिसू लागल्या आहेत. प्रचंड उत्पादन आणि स्पर्धा यामुळे तसेच दुचाकी सुलभ कर्जाच्या हफत्याने घेणे सोपे झाल्याने भारतात आज सर्वसामान्य नागरिकाची सुद्धा वाहन सुख उपभोगण्याची क्षमता वाढली आहे.
येत्या 10 वर्षात इंडियन ऑटोमोबाईल सेगमेंट मध्ये होणाऱ्या बदलांची आपण कल्पना ही करू शकत नाही. पेट्रोल वेहीकल पूर्णपणे हद्दपार व्हायची ही नांदी आहे.भारतामध्ये इलेक्ट्रिकल वेहीकल ला फार कमी लोकांनी जरी स्वीकारले असले तरी येणाऱ्या काळात भारत हे इलेक्ट्रिकल वेहीकल चे एक मोठे मार्केट म्हणून ओळखले जाईल असे तज्ञ सांगत आहेत.
ओला ची 1 लाखात इलेक्ट्रिक स्कुटर.
ओला ने S1 आणि S1 Pro अशा 2 E-स्कुटर लॉन्च केल्या आहेत.
यातील आपण S1 चे फीचर्स पाहू.
- S1 ची ex Showroom किंमत 99,999/- आहे.
- ही स्कुटर 10 रंगात उपलब्ध असून डिजाईन मनमोहक आहे.
- एकदा चार्ज केल्या वर S1 ही 121 KM चालते.
- चार्जिंग व्हायला अंदाजे 6.30 तास लागतात.
- दोन्ही चाकांना डिस्क ब्रेक आहेत.
- Bluetooth,Wifi द्वारे मोबाईल कनेक्ट करता येतो.
- Digital Speedometer,Tripmeter आणि Clock आहेत.
- 8500 Wats पावर चे इंजिन आहे.
- 7 इंचाचे स्क्रीन आहे.
- 115 KM ताशी ची वेगमर्यादा आहे.
- Anti Theft Alarm आहे.
- रिमोट आणि पुश बटण स्टार्ट सिस्टीम आहे.
- 1.8 GHZ च्या ओक्टकॉअर प्रोसेसर आणि 3 gb रॅम सहित अँड्रॉइड Os ची सिस्टीम आहे.
- सीट खाली स्टोरेज देण्यात आले आहे.
- लो बॅटरी इंडिकेटर आहे.
- स्क्रीन वर GPS Navigation आहे.
- 18 मिनिटे चार्ज केल्यानंतर 75 km चालेल अशी तजवीज गाडी मध्ये करण्यात आली आहे.
- ओला ने 400 शहरांमध्ये 1000 जागी चार्जिंग पॉईंट लावण्याचे ठरवले असून आपल्या दारात सर्व्हीस ची हमी देण्यात आली आहे.
ओला इ-स्कुटर चे उत्पादन तामिळनाडू मध्ये कृष्णगिरी इथल्या प्लांट मध्ये करण्यात येणार आहे.
बुकिंग चालू केल्याच्या पहिल्या 24 तासात च 1 लाख स्कुटर बुक झाल्याचे OLA चे Founder CEO भविष अगरवाल यांनी सांगितले. मार्केट रेडी आहे,कंज्युमर रेडी आहेत पण ऑटोमोबाईल कंपन्या तयार नाहीत असे ही त्यांनी सांगितले भारतीय ई-स्कुटर च्या क्षेत्रात OLA ही एवढ्या मोठ्या बुकिंग सहित विक्रमी ठरली आहे असे म्हणता येईल.
सद्यस्थितीत इतक्या कमी किमती मध्ये इतके फीचर्स देणारी OLA ही एकमेव कंपनी आहे असे म्हणता येईल.
पेट्रोल दरवाढ आणि वायुप्रदूषणाचा धोका पाहता OLA ई-स्कुटर घेणे अर्थात च फायद्याचे ठरणार आहे. OLA इ स्कुटर पेट्रोल वर चालणाऱ्या वाहना पेक्षा 40% किफायतशीर ठरतेय. त्यामुळे गाडी घ्यायच्या विचारात आहात तर इलेक्ट्रिकल स्कुटर आणि पर्यायीOLA इ स्कुटर का नको. खालील लिंक वर क्लिक करून OLA स्कुटर च्या वेबसाईट वर जाऊन गाडी बुक करा.
OLA च्या या शर्यतीत बजाज, TVS,Hero या कंपन्या आधीपासून मार्केट मध्ये आहेत. पण OLA ने state of the Art अशी मॉडेल लाँच केल्या नंतर ग्राहकांचा जो प्रतिसाद मिळाला आहे तो अभूतपूर्व आहे. ग्राहकांच्या आवडी निवडी चा विचार करता OLA इ स्कुटर नक्कीच एक पाऊल पुढे आहे.आता टेस्ला सारख्या दिग्गज कंपन्या सुद्धा E Bike मध्ये काय इन्व्हेन्शन करणार आहेत या कडे Automobile Industry चे लक्ष लागून आहे.

Comments
Post a Comment