तिने लॉकडाऊन मध्ये आयुर्वेदिक चहा विकून उभारली 20 करोड ची कंपनी

तिने लॉकडाऊन मध्ये आयुर्वेदिक चहा विकून उभारली 20 करोड ची कंपनी | She set up a Rs 20 crore company by selling Ayurvedic tea in Lockdown


जम्मू ची रिद्धीमा अरोरा, 26 वर्षांची कॉर्पोरेट जगतात काम करणारी मुलगी. 

वडिलांना लिव्हर सोरायसिस चे निदान झाले.ते 6 महिने च जगू शकतात असं डॉक्टरांचं निदान होतं, MBA झालेल्या आणि एका मोठ्या कंपनीत ब्रँड मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या रिद्धीमा चे हॉस्पिटल चे खेटे वाढले. तीच्या लक्षात आलं की हॉस्पिटल मध्ये कितीतरी दुःखी चेहरे आहेत ज्यांचं कुणी ना कुणी आजारी आहे, कुणाला गंभीर आजार आहेत,कुणी मृत्यूच्या दारात आहे,कुणाला हॉस्पिटल च्या बिलाचा प्रश्न भेडसावतोय.तात्पुरत्या उपचाराने,सर्जरी ने माणसाचं आजारपण  दूर होतंय पण ह्यावर ठोस असे प्रतिबंधक उपाय काय आहेत ज्या कारणाने हे विकार माणसाला उद्भवणार नाहीत असे काय आहे हा प्रश्न रिद्धीमाला पडला होता.  

PHOTO Credit- The Weekend Leader

अलोपॅथी ची ट्रीटमेंट घेतल्या नंतर आयुर्वेदा वर विश्वास ठेवणाऱ्या रिद्धीमा च्या वडिलांनी आपला आहार विहार पूर्णपणे बदलला. सर्व आहार ते आयुर्वेदिक पूरक घेऊ लागले आणि हळू हळू त्यांच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागली, ती वडिलांना काही आयुर्वेदिक घटक असलेली चहा देऊ लागली, ज्यात हरडा आणि गिलोय होते. त्यासोबत वडिलांना योग आसने करण्याची ट्रेनिंग दिली आणि आश्चर्यकारक रित्या वडीलांच्या आरोग्यात सुधारणा होत होती. 

रिद्धीमा च्या लक्षात आलं की आजारी पडल्यावर औषध उपचार घेण्या पेक्षा BP, थायरॉईड, PCOC, हार्ट, डायबेटीज असे आजार होणार च नाहीत असा आहार विहार घेतला तर?
रिद्धीमा इंजिनिअर आहे, तीचे Great Lake University चेन्नई इथे MBA झाले आहे. चांगल्या कंपनीत मार्केटिंग हेड म्हणून काम करत असताना तीच्या डोक्यात भलतंच खूळ आलं होतं. नोकरी सोडून आयुर्वेदिक औषधांची निर्मिती करणे. नोकरी चालू असताना च तिने हकीम वैद्य यांची भेट घेणे चालू केले, विविध ग्रंथ अभ्यासले. त्यानंतर तिच्या लक्षात आलं की आजार बरे होतील अशी औषधे भारतात खूप ब्रँड्स ची आहेत पण आजार च होऊ नयेत अशी प्रोडक्ट मार्केट मध्ये आणली ती पण चहा च्या स्वरूपात तर नक्कीच आपल्याला मार्केट मध्ये टिकता येईल. 

तिने अजून रिसर्च केला आणि फायनली एक प्रोडक्ट बनवलं 'हार्ट टी'  हृदयविकार असणाऱ्या लोकांच कोलेस्टेरॉल कमी व्हावा या उद्देशाने. ही हार्ट टी अर्जुन वृक्षाच्या सालीपासून बनवली. आणि 3 महिने रोज दोन वेळा पिता येतील इतके पाऊचेस चे एक पॅकेट बनवले आणि किंमत ठेवली फक्त 230 रुपये. 2019 मध्ये Namhya Foods असे ब्रँड चे नाव ठेऊन कंपनी उभी केली.Namhya Foods चे सर्वात महागडे प्रोडक्ट 450 रुपये आहे. 

Photo Source-Namhya Website



तिच्या या पहिल्या वहिल्या हार्ट टी प्रोडक्ट ची पोचपावती दिली तिच्याच मैत्रिणीने. तिच्या आईला रक्त पातळ होण्या संदर्भात औषधे चालू होती. तिला तिच्या अलोपॅथी ट्रीटमेंट सोबत च हार्ट टी हे सप्लिमेंट दिलं गेलं, तीन आठवड्यात च रिझल्ट चांगले दिसून आल्याने तिने आईची अलोपॅथी ची औषधे बंद केली. 

Photo Source- Namhya Website


रिद्धीमा ने आता अजून काही प्रोडक्टस बनवली. सध्या महिलांमध्ये PCOS हा आजार जास्त प्रमाणात बळावू लागला आहे. ह्या आजाराची चिकित्सा तिने केली 'PCOS टी बनवली.'
त्या नंतर Dibetic Tea, Thyroid Tea, Liver Cleanser Tea, Immunity Booster Latte Tea, Lung Cleanser Tea, Period Care Tea बनवली. 

या नंतर रिद्धीमा मार्केटिंग करू लागली,मार्केटिंग करताना तीला सगळीकडे नाकारलं गेलं. दुकांदारांचं म्हणणं असं होतं की 'रोज असल्या नवीन कंपन्या येतात आणि बंद पण पडतात त्यामुळे कुठल्या विश्वासाच्या आधारे आम्ही ही उत्पादने ठेवायची' रिद्धीमा ला ह्या प्रतिसादाचा अजिबात अंदाज नव्हता. मार्केटिंग आणि विक्री चे इतर मार्ग अवलंबून पाहण्याचे ठरवले, डिस्ट्रिब्युटर्स कडे खेटे मारले, स्वतःचे प्रॉफिट 0 ठेऊन डिस्ट्रिब्युटर ला जास्त मार्जिन देण्याचा प्रयत्न केला तरी ही ती प्रोडक्टस विकू शकली नाही. 

तीने तरीही न हरता जिद्दीने ही प्रोडक्टस स्वतः विकण्याचा प्रयत्न केला. ती Brand ऍक्टिव्हिटी करून लागली. ती लोकांना फ्रि सॅम्पल देऊ लागली,त्यांचे नाव नंबर घेऊ लागली आणि काही महिने ती त्यांच्या संपर्कात स्वतः राहिली जेणेकरून तिच्या औषधी चहा विषयी मार्केट फीडबॅक तिला मिळावे आणि ग्राहक ही बांधला जावा. हळू हळू तिला Word Of Mouth या पद्धतीने तिचा प्रचार होऊन तिच्या प्रोडक्टस ना मागणी येऊ लागली. ती आता कॉन्फिडेंट होती की तिची उत्पादने ही गुणकारक आहेत, आता तिने नेक्स्ट स्टेप घ्यायचे ठरवले ते म्हणजे आपली प्रोडक्ट ऑनलाईन विकणे. थोडं हटके स्टाईल ने चहा पावडर विकणे हे रिद्धीमा ला जमलं कारण तिच्या डिजिटल मार्केटिंग चा अनुभव तिच्या सोबत होता. 
तिच्या ऑर्डर्स चा डोलारा वाढत होता, तिने स्वतःची एक वेबसाईट बनवली. Amazon, Flipkart सारख्या website वर आपली प्रोडक्ट लाँच केली. प्रॉफिट दिसू लागलं आणि फंडिंग मिळू लागलं. आज जिद्दीने आणि प्रामाणिक कष्टांमुळे 2 वर्षात च रिद्धीमा अरोरा च्या  Namhya Foods ची व्हॅल्यू 20 करोड झालीय. रिद्धीमा ला अजून मोठा पल्ला गाठायचा आहे. ती चहा सोबत च ब्रेकफास्ट ची उत्पादने,न्यूट्रिशिअस सप्लिमेंट सुद्धा बनवते आहे. आज तिच्या कंपनीत 7 कर्मचारी आहेत.वडिलांच्या आजार पणा मुळे तीला मिळालेली हा मार्ग आपले सुद्धा आरोग्य निरामय करेल हा तीचा ध्यास आहे. 


Comments

Popular posts from this blog

मराठी बिझनेस आयडिया-अमृततुल्य चहा व्यवसाय करावा की नाही | Marathi business Idea-wether do or not Amruttulya Tea Business

शेरशाह विक्रम बात्रा कोण आहेत? | Who is Shershah Vikram Batra

आर्यन सुरेश कुटे-भारतातील सर्वात लहान उद्योजक 10 वर्षाचा 'मराठी' मुलगा आहे .