ऑनलाईन रम्मी गेम खेळून पैसे कमवा पण विवेक बुद्धी शाबूत ठेऊन | Play Online Rummy and Earn Money but with Descretion.
ऑनलाईन रम्मी गेम खेळून पैसे कमवा पण विवेक बुद्धी शाबूत ठेऊन| Play Online Rummy and Earn Money but with Descretion.
नाहीतर 'लेने के देने' होतील.
गल्ली बोळात,रस्त्याच्या कडेला,घराच्या ओसरी वर रम्मी चे डाव रंगतात, जुगारी हा ठपका पडेल हे माहीत असल्याने समाजात 'चोरी चुपके' रम्मी खेळली जाते.रम्मीला जुगाराचाच एक भाग मानला असल्याने समाजात चांगल्या घरात पत्त्यांचे इतर खेळ रंगतात पण 'रम्मी' हे नाव सुद्धा निषिद्ध असतं.
ही एक industry आहे| आणि काय घडतंय या इंडस्ट्री मध्ये सध्या?
सध्या Jio मुळे घरा घरात इंटरनेट पोहोचलं,आत्ताच्या घडीला 300 million स्मार्ट फोन युजर भारतात आहेत, स्मार्ट फोन मुळे कामे आणि पर्यायी माणसे स्मार्ट व्हायला लागली,या सगळ्या धांदलीत 'ऑनलाईन रम्मी' 'Online Rummy' मागे कसं राहील?
याच मुळे फेसबुक(Facebook) वर युट्युब (Youtube)वर आणि इतर सोशल मीडिया वर हल्ली रम्मी च्या वेगवेगळ्या जाहिराती बघायला मिळतात, बऱ्याच कंपन्यांची जाहिरात हे आपले फेवरीट स्टार करत आहेत,प्रत्येक दिवशी नवीन Online Rummy कंपनी चा अविष्कार आपल्याला होत असतो. याचमुळे भारतात ऑनलाईन रम्मी खेळणाऱ्यांची संख्या आज वाढली आहे. आज भारतात ऑनलाईन रम्मी ही Online Gaming Segment मधली एक 'Industry' बनत चालली आहे.
एका स्टॅटिस्टिक (Statista) कंपनी च्या रिसर्च नुसार 2024 पर्यंत ऑनलाईन रम्मी चे मार्केट 1400 Million USD असेल जे 2019 मध्ये 335 Million USD आहे.
'ऑनलाईन रम्मी' कायदेशीर आहे का|Is Online Rummy Legal.
ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकार चे रम्मी कायदेशीर आहेत. वास्तविक रम्मी हा जुगारातला प्रकार जरी मानला जात असला तरी जुगाराची व्याख्या निराळी आहे आणि रम्मी हा खेळ जुगारापेक्षा भिन्न आहे.
जुगाराची व्याख्या करायची झाल्यास 'जुगार ही एखाद्या घटनेच्या भविष्यातील फलितावरुन लावलेल्या अंदाजावरील पैसे किंवा वस्तूची देवघेव होय.'
एका ऑनलाईन रम्मी प्लॅटफॉर्म च्या वेबसाईट नुसार रम्मी हा कौशल्याचा खेळ असून याला संविधानाचे संरक्षण आहे.रम्मी सारखा कुशलता अंतर्भूत असणारा खेळ पैसे लावून खेळायला Article 19[1](g) या तरतुदी नुसार कायदेशीर मानला गेला आहे.
ह्या कलमाच्या तरतुदीचा आधार घेऊन रम्मी हा खेळ कायदेशीर ठरवला गेला आहे. पण ही तरतुद परिपूर्ण नसल्याने भविष्यात ह्या तरतुदी संबंधात ऑनलाईन रम्मी ह्या खेळा च्या अनुषंगाने एखादी याचिका दाखल होऊन हा सगळा गोरखधंदा बंद होण्याची शक्यता आहे.
तो पर्यंत बरेच पाणी पुला खालून गेलेले असेल, रम्मी खेळणाऱ्या कंपन्यानी तोपर्यंत एखादि पळवाट शोधून काढलेली असेल.
एवढं सगळं असताना अडचण काय आहे?
अडचण की मनोरंजन हे व्यक्तिपरत्वे भिन्न असू शकतं. ते ठरवण्यासाठी खालील मुद्दे बघा?
सकारात्मक मुद्दे
- निर्णयक्षमता वाढते
खेळताना अर्थात च डावपेचाच्या आधारे वेगवेगळ्या पद्धतीने खेळावं लागतं अशात योग्य निर्णय घेणे आवश्यक असते, आणि सरावाने निर्णयक्षमता वाढते आणि मानसशास्त्रानुसार ही निर्णय क्षमता आयुष्यात इतर वेळी सुद्धा कामाला येते.
- अनेक खेळाडूंसोबत खेळता येते!
रम्मी ऑनलाईन खेळताना तुमच्यासोबत प्रत्येक वेळी वेगवेगळे पण तोला मोलाचे खेळाडू खेळायला मिळतात ज्यामुळे खेळामध्ये तोच तोच पणा राहत नाही आणि आपल्या ताकदीचे खेळाडू असल्याने जिंकण्याची शक्यता 50-50 टक्क्यांची असते.
- आकर्षक रिवार्डस (Attractive Rewards).
ऑनलाईन रम्मी ला Sign In केल्या दिवसांपासून तुम्हाला Welcome bonus,जिंकल्यानंतर ची बक्षिसे,Reward Point इत्यादी मिळायला सुरुवात होते.
- सहनशीलता आणि संयम वाढतात.
कोणताही खेळ खेळताना एकाग्रता आणि संयम-सहनशीलता हे गुण वाढतात.
नकारात्मक मुद्दे.
- व्यसन लागते.
Welcome bonus,जिंकल्यानंतर ची बक्षिसे,Reward Point इत्यादींमुळे रम्मी खेळण्याचे व्यसन लागू शकते. गेम असे प्रोग्रॅम केलेले असतात की नवख्या माणसाला सुरुवातीला भरगोस बक्षिसे,पैसे इत्यादी मिळतात,
आणि याच मुळे या खेळाचे व्यसन लागू शकते,कामाच्या वेळी,कामाच्या ठिकाणी किंवा घरी किंवा कोणत्याही ठिकाणी समारंभात इत्यादी तुम्ही सतत गेम च खेळत राहाल इतकी व्यसनाधीनता या खेळाची आहे.
- उधळे पणा आणि कर्जबाजारी पणा वाढतो.
या खेळात पैसे गुंतवणूक करण्याची आवश्यकता आहे, म्हंटल्याप्रमाणे या खेळाचे प्रोग्रामिंग असे केलेले असू शकते की सुरुवातीला तुम्हाला भरपूर बक्षिसे मिळतील, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स मुळे तुमच्या सोबत कॉम्प्युटर गेम खेळू शकतो आणि तुम्ही सुरुवातीला खूप पैसे मिळू शकतात, नंतर नंतर तुम्ही हरायला लागता पण सुरुवातीचे गोड अनुभव तुम्ही मनात ठेवून पुन्हा पुन्हा पैसे लावता, गाठीचे-साठीचे,पगारामधले,धंद्यामधले पैसे तुम्ही गुंतवू लागता, ते ही संपल्यावर कर्जाऊ पैसे घेऊन खेळता आणि शेवटी नैराश्य,दिवाळखोरी आणि कर्जबाजारी पणा येतात. हे ह्या खेळाचे दाहक सत्य आहे.
- सर्व वेबसाईट ह्या सुरक्षित नाहीत.
ऑनलाईन रम्मी खेळून पैसे कमवायच्या नादात कित्येक जणांची ऑनलाईन फसवणूक होते आणि हातचे पैसे जातात.

Comments
Post a Comment