नीरज चोप्रा वर करोडोंचा वर्षाव |Rain Of Crores On Niraj Chopra
नीरज चोप्रा वर करोडोंचा वर्षाव | Rain Of Crores On Niraj Chopra
नीरज चोप्रा हे नाव आता नवीन राहील नाही, ऑलिम्पिक(Olympic) च्या सव्वाशे वर्षांच्या इतिहासात अवघी 10 गोल्ड मेडल भारताला मिळाली त्यात नीरज चोप्राचे यंदाचे योगदान लक्षणीय आहे.
23 वर्षांच्या हँडसम तरण्याबांड छोकऱ्याचा आत्मविश्वास हा त्याच्या चेहऱ्याच्या हवभावावरून ओसंडत होता.त्याच्या शरीरयष्टी आणि भालाफेकीच्या अंदाजाने सर्वांना वेड लावलं.
प्रत्येकाच्या व्हाट्सअप्प स्टेटस (Whatsapp Status) ला,न्यूज मध्ये,चर्चांमध्ये नीरज झळकतोय.
नीरज चोपरा चे मराठी कनेक्शन म्हणून टीव्ही वर बातम्या रंगल्या, महाराष्ट्रातील बहुसंख्य 'मराठा' समाजाने नीरज 'रोड मराठा' असल्याने डोक्यावर उचलून धरला.
कुणी नीरज ला जाती पातीत,प्रांत,भाषा यात बांधू नका असं म्हंटलं.
कुणी नीरज चोप्रा वर जर बायोपिक आला तर त्याची भूमिका खुद्द नीरज च साकारेल अशी त्याची पर्सनॅलिटी असल्याचं म्हंटलं,
शाम्पू (Shampoo) कंपन्यांनी,हेअर ऑइल(Hair Oil) कंपन्यांनी नीरज च्या लांब सडक केस आणि त्याला मिळालेल्या प्रसिद्धी चे गणित जुळवून जाहिराती (Advertisement) साठी संपर्क साधण्याचा खटाटोप ही केल्याचे ऐकण्यात आलं.
कुणी म्हणतंय की नीरज हा लहानपणी गोल मटोल लठ्ठ होता.
युट्युब वर नीरज च्या गर्लफ्रेंड आणि त्याच्या लाईफस्टाईल विषयी व्हिडीओ च्या व्हिडीओ बनत आहेत.
भावाने काम च तसं भारी केलंय.भारताच्या आणि भरातवासीयांच्या अभिमानात भर घातलीय.आपलं तोंड आपण च गोड करून घेतलं.
आता बक्षिसांचा वर्षाव ही कसा होतोय हे पाहू.
- नीरज ला हरियाणा सरकार ने 6 करोड रुपये रोख तसेच 50% सवलतीत फ्लॅट आणि क्लास 1 सरकारी नोकरी ची घोषणा केलीय.
- भारतीय रेल्वे ने 3 करोड देण्याची घोषणा केलीय.
- पंजाब सरकार ने 2 करोड
- मणिपूर सरकार ने 1 करोड
- भारतीय ऑलम्पिक संघाने 75 लाख
- आनंद महिंद्रा यांनी एक SUV कार देण्याची घोषणा केली आहे.
भाई की तो निकल पडी, मेहनत आहे पठ्याची.एक सर्वसामान्य घरातील मुलगा,एक विकसनशील देशातील मुलगा आपल्या प्रचंड कष्टाने जेव्हा एवढी मोठी झेप घेतो तेव्ह नशिब ह्या संकल्पनेला खोटं ठरवावं लागतं. आज भाला फेक या खेळाला भारतात वलय निर्माण होतंय. नीरज चोप्राला डोळ्यासमोर ठेऊन असंख्य मुलांमध्ये भाला फेक ह्या खेळाविषयी रुची निर्माण होईल. वास्तविक चीन आणि अमेरिके सारख्या हपापलेल्या मानसिकतेच्या देशांनी असंख्य मेडल्स जरी आणली तरी आम्ही भारत वासीय केव्हातरी मिळालेल्या यशात खूप सुखी आहोत.



Comments
Post a Comment