वेस्टीज डायरेक्ट सेलिंग कंपनी ! एक झटपट लाखो पैसा कमवायचा मार्ग-तथ्य| Vestige Direct Selling Company ! A instant way to earn millions-Fact.

आज आपल्या अवतीभवती एकतरी आपला मित्र,नातेवाईक,ओळखीचा असा व्यक्ती असतो ज्याने तुम्हाला वेस्टिज ची प्रोडक्टस घ्या अशी गळ घातलेली असते, तुम्ही त्या व्यक्तीचा मान राखून एकतर वेस्टीज ची काही हजारांची प्रोडक्ट खरेदी करता किंवा एक MLM(मल्टी लेव्हल मार्केटिंग) कंपनी चा नवीन घोटाळा (Scam) समजून त्याला टाळत असतात.

वस्तुतः वेस्टीज (Vestige)ही भारतातील अग्रगण्य Direct Selling कंपनी आहे. 2004 मध्ये स्थापन झालेल्या या कंपनी चा नुकताच 17 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. ISO 9001-2015 चे नामांकन, तसेच हलाल आणि GMP सर्टिफिकेशन असणे म्हणजे विश्वसनीय बाब आहे. कंपनी आपल्या 17 ब्रँड्स च्या 4000 पेक्षा प्रोडक्टस चे स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करते.
सौंदर्य प्रसाधने,कृषीसंबंधित उत्पादने,दैनंदिन उपयोगातील FMCG प्रोडक्टस जसे की साबण,टूथपेस्ट,किराणा सामान,आरोग्य विषयक उत्पादने,महिलांसाठी उत्पादने,डेंटल आणि ओरल  प्रोडक्टस,घरगुती उपकरणे, वॉटर प्युरीफायर,बिझनेस टूल्स इत्यादिंची दर्जेदार प्रोडक्ट रेंज वेस्टिज ची आहे. कंपनी ची ऑनलाईन ऑफलाईन अशी 3500 पेक्षा जास्त आऊटलेट आहेत तसेच डिस्ट्रिब्युटर चॅनेल मध्ये सर्वसामान्य माणसे सुद्धा किरकोळ गुंतवणुकी मधून 10-20 % फायदा कमावून आपले आर्थिक स्वातंत्र्य उपभोगत आहेत. 


एकमेकांप्रति चा आदर,प्रामाणिक पणा ह्या तत्वांवर चालून ग्रोथ करणारी वेस्टीज कंपनी अनेक फसव्या MLM किंवा Direct Selling कंपन्यांच्या यादीत अपवाद म्हणून प्रगती करत आहे. 

वेस्टिज सोबत कसे काम करावे?| How to work with Vestige? 

वेस्टिज मध्ये तुम्ही किरकोळ गुंतवणूक करून आपल्या अवती भवती असणाऱ्या लोकांना वेस्टीज उत्पादने (vestige products) खरेदी करून घ्यायला प्रवृत्त करून या व्यवहारात 10-20 % कमिशन कमवू शकता. 

दुसरं म्हणजे तुम्ही वेस्टीज कंपनी सोबत तुमच्या रेफरन्स ने माणसे जोडून त्यांना प्रोडक्ट घ्यायला प्रवृत्त करून Downline करून काही कमाई करू शकता. 

वेस्टीज मध्ये किती कमाई होते?| how much Money can be make?

वेस्टीज कंपनी मध्ये अगदी 10 रुपयांपासून लाखों रूपयांपर्यंत पैसे कमवू शकता ते ही कायदेशीर मार्गाने. 

वेस्टीज मध्ये कसे जॉईन करू शकता?|How to Join Vestige? 

वेस्टीज जॉईन करण्यासाठी तुम्हाला स्पॉन्सर(Sponser) ची गरज असते, Vestige मध्ये काम करणारा कुण्याही व्यक्ती कडे तुमचे डाऊनलायनिंग करून तुम्ही काम करू शकता, 
याच सोबत www.myvestige.com या वेबसाईट वर जाऊन स्वतःचे नोंदणीकरण करू शकता, या नंतर तुम्हाला तुमचे unique Id आणि पासवर्ड मिळते. वेस्टीज जॉईन करताना तुमच्याकडे आधार कार्ड ,पॅन कार्ड,बँक अकाउंट डिटेल्स असणे गरजेचे आहे.

वेस्टिज चे फायदे तोटे|Pros and cons ऑफ vestige.
  • फायदे
वेस्टीज जॉईन करताना तुम्ही ग्राहकांना दैनंदिन गरजोउपयोगी वस्तूच विकत असता त्यामुळे तुम्हाला कोणत्याही पैशांच्या बदल्यात ग्राहकांना त्यांच्या गरजांचे समाधान देत असता यात ग्राहकांचे उपभोग आणि कंपनी ला फायदा होतो, त्यामुळे फसवणुकीची शक्यता कमी आहे, 

वेस्टीज मध्ये काम करताना वेळेचे बंधन नाही,आठवड्याचे 7 दिवस 24 तास तुम्ही केव्हाही तुमच्या सवडीने काम करू शकता.

तुम्ही तुमचे नेटवर्क वाढवून व्यवसायाची शक्यता द्विगुणित करता व प्रेझेंटेशन आणि ट्रेनिंग मुळे आपल्या सर्वसाधारण व्यक्तिमत्वात बदल होऊन आपली एक चांगली छबी तयार होते.
  • तोटे.
वेस्टीज मध्ये सहजा सहजी कंपनी ची उत्पादने विकू शकत नाही, काही वर्षांचे प्रयत्न आणि आणि सातत्य या नंतर तुम्ही काही हजार रुपयेच कमवू शकता.

आपण वेस्टीज च्या व्यवसाया साठी आपले Natural Market चे नेटवर्क वापरतो, अशा वेळी आपल्या ओळखीचे,आपले नातेवाईक,मित्र,सहकारी इत्यादी समाजातील घटकांना वेस्टीज च्या उत्पादनांची खरेदी करण्यास गळ घालत असतो त्यामुळे आपले नातेसंबंध दुरावण्याची शक्यता अधिक असते. 

वेस्टीज मध्ये नेटवर्क वाढवणे हे खूप वेळखाऊ काम असल्याने अपेक्षित रिझल्ट आला नाही तर कंपनीचे काम करण्यात रुची कमी होऊन हे काम सोडून देणे पत्करले जाते. 

वेस्टीज च्या यशोगाथा | Vestige Success Stories 

वेस्टीज मार्केटिंग करून गरिबी तून वर आलेले, महिन्याला लाखो कमाई करणारे अनेक मान्यवर आहेत, अनेकांनी तर आपल्या चांगल्या नोकऱ्या सोडून वेस्टीज जॉईन करून आपले जीवनमान उंचावून आर्थिक स्थैर्य कमावले आहे.

पण सर्व च लोकं वेस्टीज किंवा तत्सम MLM Network Marketing किंवा Direct selling कंपनी च्या माध्यमातून इतके यश मिळवू शकत नाहीत. यात पैशांची गुंतवणूक जरी कमी असली तरी प्रचंड मेहनत आणि आदर्श  व्यक्तिमत्व या भांडवला शिवाय यश मिळणे अशक्यप्राय आहे.


Comments

Popular posts from this blog

मराठी बिझनेस आयडिया-अमृततुल्य चहा व्यवसाय करावा की नाही | Marathi business Idea-wether do or not Amruttulya Tea Business

शेरशाह विक्रम बात्रा कोण आहेत? | Who is Shershah Vikram Batra

आर्यन सुरेश कुटे-भारतातील सर्वात लहान उद्योजक 10 वर्षाचा 'मराठी' मुलगा आहे .