राकेश झुनझुनवाला यांच्या शेअर मार्केट गुंतवणूक करण्यासाठी टिप्स
शेअर मार्केट चे भारतीय बिग बुल राकेश झुनझुनवाला यांचे नुकतेच निधन झाले. एक महत्वाकांक्षी शेअर मार्केट गुंतवणूकदार, भारताचे Warren Buffet वॉरेन बफेट ,जगातील 438 वे श्रीमंत,आणि भारतीय शेअर बाजारातील एक मोठे Trader अशी त्यांची ओळख अख्या जगाला आहे. बऱ्याच शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी ते आदर्श होत.मृत्यू समयी त्यांची संपत्ती 5.8 Million (अंदाजे चाळीस हजार करोड) डॉलर इतकी होती.
शेअर मार्केट करिअर मधील सुरुवात त्यांनी 5000 रुपयांच्या गुंतवणुकी वर केली होती, ते चार्टर्ड अकाउंटंट होते. Inside Trading (शेअर मार्केट मध्ये अंतर्गत खरेदी विक्री बाजार वाढवणे किंवा घसरवणे) च्या आरोपा खाली SEBI च्या चौकशी ला सामोरे जावे लागले होते.
एखाद्या कंपनीच्या शेअर्स मध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर त्या कंपनीच्या शेअर्स चा भाव चांगलाच वधारायचा, आणि ही इन्व्हेस्टमेंट म्हणजे काही हजार करोडोंच्या संख्येत होती. जसे की त्यांची सर्वात मौल्यवान होल्डिंग घड्याळ आणि दागिने बनवणारी टायटन कंपनी ची गुंतवणूक,टायटन कंपनीमध्ये त्यांची होल्डिंग व्हॅल्यू रु 8,830.9 कोटी आहे; त्याखालोखाल स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनी रु. 4,957.1 कोटी; आणि मेट्रो ब्रँड्स रु. 2,391.3 कोटी.
शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक दारांंना कोणत्याही प्रकार चा सट्टा खेळल्यासारखी गुंतवणूक करू नका असे त्यांचे नेहमीच सांगणे होते. त्यांनी शेअर मार्केट गुंतवणूक या साठी गुंतवणूक दारांना वेगवेगळया माध्यमातून ज्या काही Tips दिल्या त्यांचा सारांश आपण ह्या लेखात वाचू.
भाव भगवान है।
कोणत्याही शेअर चा बाजारभावाला कमी लेखू नका, कारण एखाद्या बाजारभावात एखादा शेअर होल्डर शेअर विकत असतो त्याच वेळी दुसरीकडे तो शेअर विकत घेणारी व्यक्ती ही असते, त्यामुळे तुमचा शेअर खरेदी विक्रीचा निर्णय चुकला किंवा बरोबर आहे हे भविष्यात च ठरते, त्यामुळे किंमतीला कमी लेखू नका.
आशावादी राहा।
नेहमीच आशावाद आणि संधीसाधू पणा बाळगणारा व्यक्तीच गुंतवणूकदार ह्या सदरात मोडत असतो.
भावनिक गुंतवणूक टाळा।
गुंतवणुकीच्या निर्णयात भावनिक सांगड जर घातली तर तो एक पैसे गमावण्याचा मार्ग निश्चित च ठरू शकतो.नेहमीच आवडता स्टॉक घेण्या पेक्षा व्यवस्थित विश्लेषण करून निर्णय घेणे नेहमीच फायदेशीर ठरू शकतं.
गुंतवणुकी साठी कर्ज घेऊ नका।
फाजील आत्मविश्वासाने कर्ज काढून गुंतवणूक करणं बऱ्याच दा खड्ड्यात घालणारं सिद्ध होतं. कर्जबाजारी होऊन गुंतवणूक करण्यापेक्षा दुसरा मार्ग निश्चित चं योग्य ठरेल.
जोखिम पेलण्याची क्षमता तपासा।
आपण किती रुपयांचे नुकसान झेलू शकतो याची पडताळणी करून तेवढ्याच रुपयांची गुंतवणूक करणे हे कमी नुकसानदायक ठरेल.
संयम।
शेअर मार्केट गुंतवणूक करताना संयमाची पराकाष्टा ठेवावी लागेल कारण बाजारातील क्षणिक उतार आणि चढावांना घाबरून निर्णय घेतल्या मुळे बऱ्याच दा लक्षात येते की थोडा संयम ठेवला असता आणि तात्पुरत्या बाजार स्थितीला घाबरून उतावीळ पणे संभाव्य फायदा आपण गमावला आहे. व्यवसायातील तत्व जर अबाधित असतील तर निश्चित च शहाणा गुंतवणूकदार त्याचा एक ही शेअर विकणार नाही.
अशा प्रकारे शेअर मार्केट गुंतवणूक करण्यासाठी वरील गोष्टी ठाम पणे पाळता येणार असतील तर निश्चित च गुंतवणूकदार फायद्यात राहील.
सदर लेख https://trak.in ह्या ब्लॉग वरच्या लेखातून प्रभावित आहे.

Comments
Post a Comment