Posts

Showing posts with the label बिझनेस

राकेश झुनझुनवाला यांच्या शेअर मार्केट गुंतवणूक करण्यासाठी टिप्स

Image
  शेअर मार्केट चे भारतीय बिग बुल राकेश झुनझुनवाला यांचे नुकतेच निधन झाले. एक महत्वाकांक्षी शेअर मार्केट गुंतवणूकदार, भारताचे Warren Buffet वॉरेन बफेट ,जगातील 438 वे श्रीमंत,आणि भारतीय शेअर बाजारातील एक मोठे Trader अशी त्यांची ओळख अख्या जगाला आहे. बऱ्याच शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी ते आदर्श होत.मृत्यू समयी त्यांची संपत्ती 5.8 Million (अंदाजे चाळीस हजार करोड) डॉलर इतकी होती.             शेअर मार्केट करिअर मधील सुरुवात त्यांनी 5000 रुपयांच्या गुंतवणुकी वर केली होती, ते चार्टर्ड अकाउंटंट होते. Inside Trading (शेअर मार्केट मध्ये अंतर्गत खरेदी विक्री बाजार वाढवणे किंवा घसरवणे) च्या आरोपा खाली SEBI च्या चौकशी ला सामोरे जावे लागले होते.  एखाद्या कंपनीच्या शेअर्स मध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर त्या कंपनीच्या शेअर्स चा भाव चांगलाच वधारायचा, आणि ही इन्व्हेस्टमेंट म्हणजे काही हजार करोडोंच्या संख्येत होती. जसे की त्यांची सर्वात मौल्यवान होल्डिंग घड्याळ आणि दागिने बनवणारी टायटन कंपनी ची गुंतवणूक,टायटन कंपनीमध्ये त्यांची होल्डिंग व्हॅल्यू रु 8,8...

तिने लॉकडाऊन मध्ये आयुर्वेदिक चहा विकून उभारली 20 करोड ची कंपनी

Image
तिने लॉकडाऊन मध्ये आयुर्वेदिक चहा विकून उभारली 20 करोड ची कंपनी | She set up a Rs 20 crore company by selling Ayurvedic tea in Lockdown जम्मू ची रिद्धीमा अरोरा, 26 वर्षांची कॉर्पोरेट जगतात काम करणारी मुलगी.   वडिलांना लिव्हर सोरायसिस चे निदान झाले.ते 6 महिने च जगू शकतात असं डॉक्टरांचं निदान होतं, MBA झालेल्या आणि एका मोठ्या कंपनीत ब्रँड मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या रिद्धीमा चे हॉस्पिटल चे खेटे वाढले. तीच्या लक्षात आलं की हॉस्पिटल मध्ये कितीतरी दुःखी चेहरे आहेत ज्यांचं कुणी ना कुणी आजारी आहे, कुणाला गंभीर आजार आहेत,कुणी मृत्यूच्या दारात आहे,कुणाला हॉस्पिटल च्या बिलाचा प्रश्न भेडसावतोय.तात्पुरत्या उपचाराने,सर्जरी ने माणसाचं आजारपण  दूर होतंय पण ह्यावर ठोस असे प्रतिबंधक उपाय काय आहेत ज्या कारणाने हे विकार माणसाला उद्भवणार नाहीत असे काय आहे हा प्रश्न रिद्धीमाला पडला होता.   PHOTO Credit- The Weekend Leader अलोपॅथी ची ट्रीटमेंट घेतल्या नंतर आयुर्वेदा वर विश्वास ठेवणाऱ्या रिद्धीमा च्या वडिलांनी आपला आहार विहार पूर्णपणे बदलला. सर्व आहार ते आयुर्वेदिक पूरक घेऊ लागले आणि हळू हळ...

499 रुपयात बुक करा OLA ची सर्वात स्वस्त इ-स्कुटर

Image
  499 रुपयात बुक करा OLA ची सर्वात स्वस्त इ-स्कुटर S1-24 तासात झाल्या विक्रमी  लाख गाड्या बुक| Book OLA eScooter S1 For 499/-  Many Color-All Green हे ब्रीद वाक्य आहे OLA च्या इ-स्कुटर चे. 10 रंगात येणारी ही स्कुटर पर्यावरणासाठी ग्रीन आहे असे OLA ला सुचवायचे आहे. PHOTO Credit-Livemint.com इ स्कुटर म्हणजे इलेक्ट्रिकल चार्जिंग वर चालणारी स्कुटर.इलेक्ट्रिकल वेहीकल या पेट्रोल सारख्या पारंपरिक इंधना पेक्षा स्वस्त मेंटेनन्स देतात,तसेच धूर सोडत नसल्याने इलेक्ट्रिकल वेहिकल च्या वापराने वायू प्रदूषण निश्चित च मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे.सध्या भारतात 15 करोड दुचाक्या आहेत ज्या पेट्रोल वर चालतात.एकेकाळी गावात क्वचित सधन श्रीमंतांकडे दिसणाऱ्या दुचाक्या आता प्रत्येक दारात दिसू लागल्या आहेत. प्रचंड उत्पादन आणि स्पर्धा यामुळे तसेच दुचाकी सुलभ कर्जाच्या हफत्याने घेणे सोपे झाल्याने भारतात आज सर्वसामान्य नागरिकाची सुद्धा वाहन सुख उपभोगण्याची क्षमता वाढली आहे.  येत्या 10 वर्षात इंडियन ऑटोमोबाईल सेगमेंट मध्ये होणाऱ्या बदलांची आपण कल्पना ही करू शकत नाही. पेट्रोल वेहीकल पूर्णपण...

हनुमंत गायकवाडांची BVG देतेय ONLINE पैसे कमावण्याची संधी,Cash My Lead Application

Image
हनुमंत गायकवाडांची BV G देतेय ONLINE पैसे कमावण्याची संधी,Cash My Lead Application वरून लीड्स जनरेट करा आणि BVG तुम्हाला पैसे देईल.| Hanumant Gaikwad 'S   BVG giving you the opportunity to earn money ONLINE, generate leads from Cash My Lead Application and BVG will pay you. महाराष्ट्रात अनेक तरुण आहेत ज्यांना स्वतःचा उद्योग सुरू करायचा आहे,स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे पण भांडवला अभावी सर्व अडतंय. मशिनरी मध्ये गुंतवणूक करावी लागते,फॅक्टरी बांधावी लागते,त्यासाठी जागा मिळवावी लागते,कुशल कामगारांची अडचण आहे,प्रोसेसिंग कशी करावी हे माहीत नसतं, या सर्व गोष्टींचा विचार करता Bvg India गृप च्या संचालक श्री हनुमंत गायकवाड यांनी सातारा मेगा फूड पार्क इथे भव्य दिव्य असे इन्फ्रास्ट्रक्चर उभारले आहे ज्यात नवउद्योजकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी त्यांना उत्पादन करण्यासाठी लागणाऱ्या फॅक्टरी चा सेटअप आधीच तयार आहे, तुम्हाला फक्त प्रोसेसिंग ची फी आणि किरकोळ गुंतवणूक करून तुमचे स्वप्न साकार करता येणार आहे. या लेखात या विषयी संक्षिप्त स्वरूपात माहिती दिली आहे. अधिक माहिती साठी तुमचा मोबाईल नंबर ...

ऑनलाईन रम्मी गेम खेळून पैसे कमवा पण विवेक बुद्धी शाबूत ठेऊन | Play Online Rummy and Earn Money but with Descretion.

Image
  ऑनलाईन रम्मी गेम खेळून पैसे कमवा पण विवेक बुद्धी शाबूत ठेऊन| Play Online Rummy and Earn Money but with Descretion . नाहीतर 'लेने के देने' होतील. गल्ली बोळात,रस्त्याच्या कडेला,घराच्या ओसरी वर रम्मी चे डाव रंगतात, जुगारी हा ठपका पडेल हे माहीत असल्याने समाजात 'चोरी चुपके' रम्मी खेळली जाते.रम्मीला जुगाराचाच एक भाग मानला असल्याने समाजात चांगल्या घरात पत्त्यांचे इतर खेळ रंगतात पण 'रम्मी' हे नाव सुद्धा निषिद्ध असतं.  ही एक industry आहे| आणि काय घडतंय या इंडस्ट्री मध्ये सध्या? सध्या Jio मुळे घरा घरात इंटरनेट पोहोचलं,आत्ताच्या घडीला 300 million स्मार्ट फोन युजर भारतात आहेत , स्मार्ट फोन मुळे कामे आणि पर्यायी माणसे स्मार्ट व्हायला लागली,या सगळ्या धांदलीत  'ऑनलाईन रम्मी' ' Online Rummy ' मागे कसं राहील?  याच मुळे फेसबुक( Facebook ) वर युट्युब ( Youtube )वर आणि इतर सोशल मीडिया वर हल्ली रम्मी च्या वेगवेगळ्या जाहिराती बघायला मिळतात, बऱ्याच कंपन्यांची जाहिरात हे आपले फेवरीट स्टार करत आहेत,प्रत्येक दिवशी नवीन Online Rummy कंपनी चा अविष्कार आपल्याला होत अ...

वेस्टीज डायरेक्ट सेलिंग कंपनी ! एक झटपट लाखो पैसा कमवायचा मार्ग-तथ्य| Vestige Direct Selling Company ! A instant way to earn millions-Fact.

आज आपल्या अवतीभवती एकतरी आपला मित्र,नातेवाईक,ओळखीचा असा व्यक्ती असतो ज्याने तुम्हाला वेस्टिज ची प्रोडक्टस घ्या अशी गळ घातलेली असते, तुम्ही त्या व्यक्तीचा मान राखून एकतर वेस्टीज ची काही हजारांची प्रोडक्ट खरेदी करता किंवा एक MLM(मल्टी लेव्हल मार्केटिंग) कंपनी चा नवीन घोटाळा (Scam) समजून त्याला टाळत असतात. वस्तुतः वेस्टीज ( Vestige )ही भारतातील अग्रगण्य Direct Selling कंपनी आहे. 2004 मध्ये स्थापन झालेल्या या कंपनी चा नुकताच 17 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. ISO 9001-2015 चे नामांकन, तसेच हलाल आणि GMP सर्टिफिकेशन असणे म्हणजे विश्वसनीय बाब आहे. कंपनी आपल्या 17 ब्रँड्स च्या 4000 पेक्षा प्रोडक्टस चे स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करते. सौंदर्य प्रसाधने,कृषीसंबंधित उत्पादने,दैनंदिन उपयोगातील FMCG प्रोडक्टस जसे की साबण,टूथपेस्ट,किराणा सामान,आरोग्य विषयक उत्पादने,महिलांसाठी उत्पादने,डेंटल आणि ओरल  प्रोडक्टस,घरगुती उपकरणे, वॉटर प्युरीफायर,बिझनेस टूल्स इत्यादिंची दर्जेदार प्रोडक्ट रेंज वेस्टिज ची आहे. कंपनी ची ऑनलाईन ऑफलाईन अशी 3500 पेक्षा जास्त आऊटलेट आहेत तसेच डिस्ट्रिब्युटर चॅनेल मध्ये सर्वसामा...

मराठी बिझनेस आयडिया-अमृततुल्य चहा व्यवसाय करावा की नाही | Marathi business Idea-wether do or not Amruttulya Tea Business

Image
अमृततुल्य चहा Franchise | Amruttulya Tea Franchise स्वच्छ टकाटक दिसणारे चहाचे पॉश आऊटलेट,  त्या बाहेर किटली आणि कप घेऊन सफेद लेंगा किंवा धोतर घातलेला, डोक्यावर मराठीपणाची ओळख म्हणून गांधी टोपी घातलेला एका रांगड्या मध्यमवयीन मिशिवाल्या काकांचा पुतळा, दुकानावर कॅलिग्राफी केलेला छान 'अमृततुल्य' चा ठळक आकर्षक साईन बोर्ड. दुकानात स्टील च्या ट्रे मध्ये ठेवलेले विशिष्ठ आकाराचे असंख्य चहा कप, आत मध्ये स्वच्छ पेहरावात असणारा कामगार वर्ग, आणि चहा च्या चवीची आणि वासाची एक विशिष्ट अशी धाटणी, ही झाली'अमृततुल्य चहा' ची ओळख.   येवले यांनी सुरुवात केली. बघता बघता शेकडो फ्रांचायजी झाल्या. येवले अमृततुल्य च्या आगळ्या वेगळ्या चवीची भुरळ लोकांना पडली. 'येवले चहा-एकदा पिऊन तर पहा 'असे आवाहन,  येवलेंच्या प्रत्येक आऊटलेट मध्ये प्रत्येक दिवशी चहाची सारखीच चव आणि गुणवत्ता, यामुळे येवले अमृततुल्य चहा बघता बघता सर्वांची फेवरीट झाली  फ्रांचायजी मॉड्युुुल मध्ये चहा व्यवसाय इतक्या मोठ्या मोठ्या स्तरावर नेण्याचे श्रेय येवलेना जाते.ह्या व्यवसायाची गमके जणू सोपी असल्या सारखी इतर लोकांनी ही...